Monday, January 12, 2009

The first śloka

Valmiki was going to the river Ganga for his daily ablutions। A disciple by the name Bharadwaja was carrying his clothes. On the way, they came across the Tamasa Stream. Looking at the stream, Valmiki said to his disciple, "Look, how clear is this water, like the mind of a good man! I will bathe here today." When he was looking for a suitable place to step into the stream, he heard sweet chirping of birds. Looking up, he saw two birds flying together. Valmiki felt very pleased on seeing the happy bird couple. Suddenly, one of the birds fell down hit by an arrow; it was the male bird. Seeing the wounded one, its mate screamed in agony. Valmiki's heart melted at this pitiful sight. He looked around to find out who had shot the bird. He saw a hunter with a bow and arrows, nearby. The hunter had shot the bird for food. Valmiki became very angry. His lips opened and he uttered the following words: Bharadwaja was one of the great sages (rishis) whose accomplishments are detailed in the Puranas. ...

mAnishAda pratishTAtum samagah ssAshvatIssamAh
yat krouncha mithunAdEkam sokam avadhIm kAma mOhitam

"You who have killed one of the birds engaged in the act of love,
thus, may you not yourself live long!"


This was the first shloka in Sanskrit literature. Later Valmiki composed entire Ramayana due to the blessings of Lord Brahma in the same meter that issued forth from him as a sloka. Thus this sloka is revered as the "first sloka" in Hindu literature. Valmiki is revered as the first poet, or Adi Kavi,

Wednesday, January 7, 2009

फुल

फुला फुलात फिरताना एक फुल सापडलं
मान टाकुन बसलेल , पाना मागे दड्लेलं

"बाबा तुला झालय काय" मी त्याला विचारलं
तसं ते अंग चोरून अधिकच हिरमुसलं
"रंग तुझा बरा आहे
वास सुद्धा खरा आहे
मग काय झाल रडायला ?
पाना मागे दड़ायला ?
जग कुठे चाललय पहा
जरा सगळ्यात मिसळून रहा
अवती भवति तुझ्याच सारखी किती फूले फुलली आहेत
कधी त्यांच्या रंगाला तर कधी त्यांच्या गंधाला , किती मने भुलली आहेत...
तुला नाही का आवडणार त्यांच्यासारख फुलायला?
हवेवरती डुलायला नि फांद्यानवरती झुलायला?"

माझ्या थोड्या गप्पा ऐकुन फुल जरा सावरलं
आणि थोड़ा धीर करून हळूच मला म्हणालं

"ठाऊक आहे मला की छान आहे माझा रंग,
गंध देखिल खरा आहे , कोमल आहे माझे अंग
सगळयान्च्या कौतुकाला फुलेच वेडी भुलतात
उगाच भाबडी खुश होवून वार्यावरती डुलतात
गोड गोड बोलत माणसे हळूच त्यांना खुड्तात
तेवा कुठे डोळ्यावरची त्यांच्या झापडे उडतात

म्हणुन मी मान पाडून पाना मागे लपलो आहे
फुलावेसे वाटुनही पाकळ्या मिटून बसलो आहे

ठर्वलेच आहे मी हे असेच जगायचे
जग किती वाइट आहे हे मी का तुला शिकवायचे ?"

Monday, January 5, 2009

जीवन मनप्रमाणे जगून घ्या .....

किती आली वादळे
किती पडल्या गारा
वाहतो छान हा
जीवनाचा गार वारा
त्याच्याबरोबर स्वताहाला वाहून
जीवन मनप्रमाणे जगून घया.....

हे करू की नको?
केले तर काय?
नाहीतर काय?
प्रश्नाच्या जाळ्यात अडकू नका
जीवन फुकट घालउ नका
सगळे प्रश्न सोडून द्या
जीवन मनाप्रमाणे जगून घ्या.....

प्रत्येक टाळ्याची चावी असतेच
शोधून घ्या, तरीही मिळत नसेल तर
वेळ न दवडता , टाळेच तुम्ही बदलून घ्या
जीवन मनाप्रमाणे जगून घ्या.....

अरे आपण जगलोच नाही का आयुष्यात?
प्रश्न स्वता:ला मरताना विचारू नका
प्रश्नाना पकडून रडू नका
आयुष्य कडू बनउ नका

सगळे प्रश्न सोडून द्या
जीवन मनाप्रमाणे जगून घ्या.....

swati...