Monday, February 16, 2009

अनामीक - १

बिस्किट खाणारा बोका
खरा.
विहीर खननारे मजूर
झुंज़तात.
लाइफस्टाइल सांभाळून
जगतात लोक.
पाच बोटांवर तीन शन्ख
दोन चक्र.

आईन्स्टाईन मात्र शोध लावत मेला...

लायब्ररी रोज़ भरते पोरांनी
सकाळ संध्याकाळ.
हाताना कंप सुटतो
लिहिताना.
सोमा सुनेच्या अंथरुणात
घुसतो
सिगारेटी फुन्कल्यावर
नुसता धुरच राहतो.

होकायंत्र उत्तर दिशा दाखवत राहत...

तृतीय पन्ती गाणे म्हणतात
भसाड्या आवाजात.
दारू दिली तर
कावळा शिवतो.
कामाठी पुरात अजूनही
शनीचा वास आहे.
मीही पिक्चर पाहाताना
पॉपकॉर्न खातो.

जगात तीन सेकंदाला एक पोर जन्माला येत राहत...

Wednesday, February 11, 2009

जग तुझ माझ

जग तुझ
रंगांनी नटलेल
जग माझ
दंग्यान्नी पेटलेल
जग तुझ
फुलांचा गंध
जग माझ
धर्मान्ध
जगात तुझ्या
शिम्पल्यातले मोती
जगात माझ्या
भाषा आणि जाती
जगात तुझ्या
वारे तारे आम्ही सारे
जगात माझ्या
द्वेशाचे निखारे
जगात तुझ्या
सगळे सुंदर सगळे सारखे
जगात माझ्या
सगळे एकटे, सगळे पारखे


जग तुझ
निळ आकाश
जग तुझ
सुर्याचा प्रकाश
जग तुझ
सागराची गाज
जग तुझ
हिरवाइचा साज

कस रे जग तुझ इतक सुंदर निवांत ?
का माझ जग अस अस्वस्थ अशांत ?
देशील का तुझ्या जगातला थोडासा गारवा ?
थोडासा प्रकाश आणि एक पांढराशुभ्र पारवा... ?