ही तर माझ्या नशीबाणे ठरवलेली वाट,
माझ्या स्वप्नांना कधी मिळणार पहाट.
आज आयुष्याशी नाही कॉणत भांडण,
पण तरी उदास आहे मनाचे आंगण
व्यावहाराच्या चाकोरीवर दौडतायात अश्व,
यापलिकडेही जागतोय एक भावनांच विश्व.
क्षणिक सुखांचा धरलाय आहे अट्टहास,
काहीतरी मिळवल्याचा उगाच होतोय भास.
मी कोण? या प्रश्ना मागे मन राहते पळत,
लाख प्रयत्नांती गणित नाही जुळत.
नशीबच्या रुळांवर चालवतोय आयुष्याला.
दर दिवशी शोधतो आहे मी स्वताला
नको मला आशस्वसकाता, नको जमेची पावती
फक्त एक दिवस असावा मी माझ्याभोवती
माझ्यातला मी शोधण्यात होईल कदाचित त्रास,
अखेरचा दिवस तरी मी म्हणून जागेन हा आहे विश्वास.
एक दिवस तरी मला योगेश म्हणून जगायाच.
नशीबच्या गां*वर लाथ मारुन मनसोक्त हसायचाय.
Wednesday, March 25, 2009
Subscribe to:
Posts (Atom)