काळ्याभोर रात्रीनंतर
जशी एक नवी पहाट
पाहतो जशी चातक
पहिल्या पावसाची वाट...
ताहनेनें व्याकूळ ज़हाला
पण चिंता नाही त्याला
सांगे तो , शांत स्वरात
पाहतो रे, अमृताची वाट...
पाउस आला आनंद जाहाला
पाणी पिऊन शांत जाहाला
पण संपत नाही त्याचा प्रवास
आता पुढल्या पावसाची वाट.....
माणूस आणि चातक,
दोघे आशावादी फार
सुखी नाहीत आजच्या आयुष्यात
स्वप्नांच्या ते जीवनात
ज़ेप त्यांची आकाशात.....
काळ्याभोर रात्रीनंतर
जशी एक नवी पहाट
पाहतो जशी चातक
पहिल्या पावसाची वाट...
स्वाती..
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
Shighra Kaviyatri..
Surekh Kavita
Hemant
mastaach...
सुंदर कविता. छान शब्दबद्ध केलीय.
Post a Comment