Monday, April 13, 2009

भास

उडत्या भिंगरीच अल्लड लेकरू,
मन एक वेल्हाळ पाखरू.

पाहते ह्रुदयि स्वपन सोनेरी
नाही कोणती ईछा अघोरी

सवैर विहरते उंच नभ आकाशी,
स्पर्धा त्याची फक्त स्वतशी.

एकराती तया संग लाभला तारकेचा,
सापडेना ठाव तया हर्षाचा.

झोम्बॅला गारवा शीतलप्रकाशी ,
रोमांचल्या सुप्त भावना मॉरपिशी.

उगवताच दिन तुटले स्वप्न अवखळ,
तयात तारका जहाली मृगजळ.

एकालेच मन अतीव धडपडले,
परी ना अस्तीव दिनाकरचे संपले.

कोसळले ते भीरभिरते धर्णिवरती,
कुणा दया ना आली तयावरती.

किंचित दुखी, ना नाराज कुणावर,
हसले फक्त ते शांतपणे स्वतावर.

ज्याची धरली होती तायाने आस,
ते स्वप्न ठरले एक निव्वळ भास.

No comments: