एक अश्रू ओघाळला,
आणि गालावर येऊन बसला.
मी काही बोलायाच्या आत,
माझ्याकडे बघून हसला.
वरुन मला म्हणतो कसा,
ए वेड्या तू एवढा दुखी कसला.
काय अस झाल तुझ की,
तू एवढा रुसून बसला.
सुख-दुखाचा आलेख नेहमीच,
होत असतो वरखाली.
चिंता करत नको बसू,
यानेच तर आयुष्यात रंगत आली.
दररोज एक नवीन पहाट,
एक नवीन दिवस उजडतो.
ए रड्या आता रडू नकोस,
तुझी सरी दुख: घेऊन मी निघून जातो.
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
Chan....atishay sunder :)
chaan..
Good going guys. wonderful. Hope all of you are doing well. what's new? feed me in.
Post a Comment