Monday, December 15, 2008

पहिल्या प्रेमाची अंतयात्रा

ओठांवर मिसरूड फुटताना मनातील कोमल भावनानी केल बंड,

तिसर्‍या बेंच वरुन दिलेल्या तिच्या तिरप्या नजरेने मी झालो पुरता थंड !!

आता दिवसागणिक माझ टापटीप रहण लगाल वाढु,

वर्गातील मस्ती करणार्‍या मुलांच वागण वाटू लगाल कडू !!

प्रत्येक तासाला आता नजरेची कॅच – कॅच खेळण्यात जात होता वेळ,

प्रेमाच्या पहिल्या इन्निंग चा सुरू झाला होता खेळ !!

रात्रीची झोप आता झाली होती कोसो दूर,

मनातल्या स्वप्नांना आता सापडले होते सप्तसूर !!

शाळा सुटल्यावर तिने मला थांबवल नाजूक इशार्याने,

माझ्या मनातील धडधड वाढु लागली एका हलक्या शहार्याने !!

आता बस ‘सातवा आसमान’ म्हणतात काय ते त्यावर आपण चढलो,

आणि तिने दिलेल्या चीठीवर माझ्या मित्राचे नाव बघून त्याच वेगाने पडलो !!

तर अशी आहे माझ्या पहिल्या प्रेमाची कहाणी माझ्या मित्रा,

जीची सुरू होण्या अगोदरच निघाली आखया वर्गात अंतयात्रा……!!

5 comments:

Hemant Kadlak said...

he Bhagwan.....
Ase zale hote kay? :)
Jokes apart..Solid hain tu bhai..
Kya likha hain...
Lage raho...

R@JU said...

shree ram.. jai ram... jai jai ram....

समीर said...

JABARDAST!!!!! PROFFESSIONAL KAVI!!!

Shweta Tarkar- Narvekar said...

Are re ! next time tuzya mitra la dilelya chithit tuz naav nakkich asnar. :)

Sujata said...

Solid!!!

Hum tumhare fan ho gaye...

Waiting for more.......