खरच तुला कळत नाही.........
तुझ ते रुसण,
आणि परत हसण,
माझ त्यात रुळण,
आणि तुझ नुसतच खेळण.
खरच तुला कळत नाही........
तुझ ते चालण,
नकळत वाट टाळण,
माझ ते जळण ,
आणि तुझ वळूनही न पाहाण.
खरच तुला कळत नाही........
तुझ ते सजण.
मुरडत मुरडत लाजण.
मझ त्यात हरण,
आणि तुझ नेहमीच जिंकण.
खरच तुला कळत नाही........
तुझ ते पाहण.
नखरे करत रहाण.
माझ त्यात भूलण,
आणि तुझ नुसतच झूलण.
खरच तुला कळत नाही,
का काळतय पण वळत नाही.
असतात अशी काही गणित,
जी काही केल्या जुळत नाही.
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
Thik ahe...
Hemant
Post a Comment