Monday, December 29, 2008

हार - जीत

जिंकण्या हरण्याच्या आयुष्याच्या या खेळात
मी कधी हरले नाही, पण माझ जिंकायच राहून गेलय्

जेव्हा असं वाटल की आज मी जिंकले,
त्याच्या दुसर्‍याच क्षणी वाटल की
मी माझ ध्येय गाठलच नाही
दर दिवशी ध्येयाच्या कल्पना बदलतात
आणि वाटत की माझ जिंकायच राहून गेलय्

हरण्या जिंकण्याच्या प्रत्येकाच्या व्याख्या वेगळ्या
आणि माझ्या तर सतत बदलत राहिल्या,
म्हणूनच की काय माझ जिंकायच राहून गेलय्

एक क्षण खूपच वाईट
हातातल सगळ निसटून गेलय,
पण दुसर्‍या क्षणी वाटल की नाही,
मी अजुन हारलेली नाही
फक्त माझ जिंकायच राहून गेलय्

-श्वेता :)

Thursday, December 25, 2008

भडास्

असं नव्हत की मला काही सुचतच नव्हत

फक्त सुचलेल कागदावर उतरत नव्हत

मनात विविध कल्पनांच वादळ पेटायच

पण तसच शांत आवंढा गिळून बसायच

आणि मग एक दिवस 'भडास्' च्या निमित्ताने

मनीच्या कल्पकतेला रिमझिमण्याच निमित्त मिळाले

मनातले वादळ कागदावर उतरले

आणि माहीत नसलेल कवी मन मला उमजू लागले

कंटाळलेल्या क्षणांना उत्साही पालवी फुटली

आणि कित्येक मनं कवितांनी बहरू लागली

-श्वेता :)

Saturday, December 20, 2008

कालनिणॅय

काळाच भान..
आणि संस्कृतीचा मान...
लाल अक्षरांचा रविवार...
आणि निळ्या रंगाचा सोमवार..
अबोली संकष्टी...
आणि गुलाबी एकादशी...
हवेशीर शिवरात्री..
आणि उपवासाची नवरात्री..
फटाक्यांची दिवाळी आली..
आणि ईद मुबारक झाली..
असे कालनिणॅय भिंतीवरी..
सूखसमृद्दी नांदे घरी..

-श्वेता :)

Friday, December 19, 2008

मन...

कोणाचे हळवे असते, कोणाचे कठोर असते
पण मन हे नेहमी विचारात दंगच असते...

ह्सते ह्सवीते, रडते रडविते
सुखाबरोबर दुख:ही जमा करते
मेंदूच्या वीरूद्ध पक्षात तेच तर नेहमीच असते...
पण मन हे नेहमी विचारात दंगच असते...

मेंदुबरोबर याचा छात्तिसचा आकडा
मनाचा आणि मेंदूचा मार्गच जणू वाकडा
काही देखील मन आपल्या परीने निस्तरते
पण मन हे नेहमी विचारात दंगच असते...

दुसर्यांच्या मनाची काळजी तेच तर करते
त्रास घेणे - देणे हे तर त्याच्या जीवनातच असते
मेंदूची कारवाई तेच तर फेटाळते
पण मन हे नेहमी विचारात दंगच असते...

कोणीच जवळ नसताना तेच तर फार जवळ असते
कारण मन हे नेहमीच हृदयातच विसवते
शेवटी मन म्हणजे जीवनच असते
आणि जीवन हे मनाप्रमाणेच जगायचे असते....

..... स्वाती

Thursday, December 18, 2008

aamchaa mitr..

Kadhi 'Vengamma ponge ponge' gaaun idli dosa vikto,
tar kadhi Michel Jackson hi laajel asa break dance karto,
Raatri jaagun jaagun Project delivery karto,
aani tyaach raatri na zoptaa tasaach thet aaplyaa groupchya picnic laa yeto,
Kadhi, aapan Vendors barober haarat aalelyaa cricket matchlaa shevatchya innings madhe saawarto,
Tar kadhi Alibaug chyaa vaaloot shaant baslelyaa aaplyaa mitra-mandalilaa aaplyaa chaalyaanni utsaahit karto!
Nehmich amhaala ha maanoos, kuthli hi goshta seriously na ghenaara vaatato,
Pan kadhi kadhi haach maanoos amhala tyachya pahilya premavar kavita lihun radavto!


Asa ha anek chattanni bharlelaa aahe aamcha mitr..Hityaa.

--Juilee

Wednesday, December 17, 2008

चातक ....

काळ्याभोर रात्रीनंतर
जशी एक नवी पहाट
पाहतो जशी चातक
पहिल्या पावसाची वाट...

ताहनेनें व्याकूळ ज़हाला
पण चिंता नाही त्याला
सांगे तो , शांत स्वरात
पाहतो रे, अमृताची वाट...

पाउस आला आनंद जाहाला
पाणी पिऊन शांत जाहाला
पण संपत नाही त्याचा प्रवास
आता पुढल्या पावसाची वाट.....

माणूस आणि चातक,
दोघे आशावादी फार
सुखी नाहीत आजच्या आयुष्यात
स्वप्नांच्या ते जीवनात
ज़ेप त्यांची आकाशात.....

काळ्याभोर रात्रीनंतर
जशी एक नवी पहाट
पाहतो जशी चातक
पहिल्या पावसाची वाट...


स्वाती..

Tuesday, December 16, 2008

पहिल प्रेम

सुट्टीनंतर.......

शाळेची वाट.... म्हणजे पहिल प्रेम..

मे च्या उकड्यानंतर.......

ओला गार जून .... म्हणजे पहिल प्रेम..

गणिताच्या तासानंतर.......

चिञकलेचा तास .... म्हणजे पहिल प्रेम..

असंख्य नज़रांच्या शोधानंतर.......

'ती' एक गोड नज़ऱ....... म्हणजे पहिल प्रेम..

हज़ारो कंटाळलेल्या क्षणांनंतर.......

एक उत्साही क्षण....... म्हणजे पहिल प्रेम......

-श्वेता :)

Monday, December 15, 2008

pahil prem..

ayushyaatil sarvaat pahilaa kshan,
jevhaa me swataahaalaa haravun baslo!

dolye ughadtaa kshanich tu dislis!
aani me tula pahatach baslo!

majya nazaretil tu pahili vyakti,
aani pahilyaa nazaretach me premaat padlo!

tu aahes maaza Pahil Prem 'Aai'..
tujyaa baddal ajun kiti lihu?
mee shabdaan'naach kami padlo!

..Julie

पहिल्या प्रेमाची अंतयात्रा

ओठांवर मिसरूड फुटताना मनातील कोमल भावनानी केल बंड,

तिसर्‍या बेंच वरुन दिलेल्या तिच्या तिरप्या नजरेने मी झालो पुरता थंड !!

आता दिवसागणिक माझ टापटीप रहण लगाल वाढु,

वर्गातील मस्ती करणार्‍या मुलांच वागण वाटू लगाल कडू !!

प्रत्येक तासाला आता नजरेची कॅच – कॅच खेळण्यात जात होता वेळ,

प्रेमाच्या पहिल्या इन्निंग चा सुरू झाला होता खेळ !!

रात्रीची झोप आता झाली होती कोसो दूर,

मनातल्या स्वप्नांना आता सापडले होते सप्तसूर !!

शाळा सुटल्यावर तिने मला थांबवल नाजूक इशार्याने,

माझ्या मनातील धडधड वाढु लागली एका हलक्या शहार्याने !!

आता बस ‘सातवा आसमान’ म्हणतात काय ते त्यावर आपण चढलो,

आणि तिने दिलेल्या चीठीवर माझ्या मित्राचे नाव बघून त्याच वेगाने पडलो !!

तर अशी आहे माझ्या पहिल्या प्रेमाची कहाणी माझ्या मित्रा,

जीची सुरू होण्या अगोदरच निघाली आखया वर्गात अंतयात्रा……!!

Sunday, December 14, 2008

पाहिले प्रेम

पाहिले प्रेम
जसे...
खळ खळनारे पाणी..
मनातली बेधुन्द गाणी..
पावसातला गारवा..
तुज़या मिठीतला विसावा..

पहिले प्रेम..
जसे...
जागेपनीचे स्वप्न..
न कळणारे प्रश्न..
जसे आठवणींचे गातोडे..
चांदण्यातले विसवणे..

पहिले प्रेम.. :-)

Friday, December 12, 2008

भेट तुझी आन् माझी

भेट तुझी आन् माझी,
बेधुन्द बरासाणार्‍या पावसाची,
रिमझिम रिमझिम सुरांची,
तुला पाहताच अडखळलेल्या शब्दांची,
जवळ येताच तू, थांबलेल्या श्वासांची,
स्पर्श होता तुझा विसरलेल्या भानाचि...
भेट तुझी आन् माझी,बेधुन्द बरासाणार्‍या पावसाची...

मुठीतला श्वास

गार गार थेंबांचा संपला होता प्रवास
दरवरला पहिल्या प्रेमाचा सुवास
घट्ट मुठीतला सोडला होता मी श्वास
पाहाताच तुला लागला तुजाच ध्यास
शालेचा पहिला दिवस होताच तसा ख़ास

गार गार थेंबांचा संपला होता प्रवास...


raju-

Thursday, December 11, 2008

जा....

मनातले काही सांगुन जा ,
आठवानींची गाठ सोडून जा ,
ओल्या तैया ओठातूनी ,
प्रेम गान हळूच गाउन जा..

Sub: Pahil Prem

Mann hya kavitene survat tar zali pan ajoon konachya manat aal nahi vatat hi survat pudhe nenya sathi .... well... aapan ek vishay tharvalay tyawar kahitari lihuya ... PAHIL PREM ...

Sarv KAVI aani KAVYITRIN kadoon kahitari apekshit aahe ...

Tuesday, December 9, 2008

Ankur

Mann

mann kadhi dhannyavaadaanchey gucc'ha,
mann kadhi premaachey mandir,
mann kadhi raagaachi talwaar,
mann kadhi apulkichey maaher,
mann kadhi fakta prasnnanchey pustak,
mann kadhi tyach prashnannchey uttar,
mann kadhi bheetichi saawli,
mann kadhi vishwasachi murti,
mann kadhi ashrunchey saagar,
mann kadhi aanandaachey paajhar..